loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवली मावळता कोंडवाडीत दि. 20 ते 22 जानेवारीला रौप्य महोत्सवी माघी गणेश जयंती उत्सव

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील श्री गणेश नवतरुण विकास मंडळ मावळता कोंडवाडी येथे रौप्य महोत्सवी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात आणि विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. गणेश जयंतीचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 20 जानेवारीपासूनच सुरू होणार असून यानिमित्त सकाळी 8 वाजता श्री गणेश मूर्तीवर अभिषेक दुपारी. 3 ते 8 वा.सांस्कृतिक कार्यक्रम रात्री 8 वाजता महाप्रसाद.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 8. वाजता गणेश मूर्तीवर अभिषेक सकाळी 9 वा. वाडी अंतर्गत क्रिकेट स्पर्धा दुपारी 1 वाजता महाप्रसाद सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ रात्रौ 7.30 ते 9.30 हरी ओम संत नाम वारकरी संप्रदाय चिपळूण यांचे कीर्तन कीर्तनकार ह. भ. प. निलेश महाराज पवार मृदुंगचार्य ह. भ. प. आदित्य महाराज सुतार गायनाचार्य ह.भ. प.रीतेश महाराज भोसले. 9 वा. महाप्रसाद गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी रौप्य महोत्सवी माघी गणेश जयंती सकाळी 8 ते 9 वा. अभिषेक , तसेच होम हवन, सत्यनारायण महापूजा महाआरती दुपारी महाप्रसाद. 2ते 3 महिलांसाठी हळदीकुंकू 4 ते 5 भजन 5 ते 7 वा. प्रदक्षिणा व दिंडी रात्रौ 8 ते 9 वा. महाप्रसाद.

टाईम्स स्पेशल

या उत्सवानिमित्त आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, विलास चाळके, रजनी चिंगळे, संजय कांबळे, जया माने, सरपंच आरोही रावण, उपसरपंच विजय घुमे ,पो. पा. विजय चाळके, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश चाळके, माजी उपसरपंच सुरेश चाळके, ग्रा.पं स. राजश्री चाळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रात्र 9. ते 10 वा. सत्कार समारंभ रात्रौ 10:30 वाजता केदारलिंग नाट्य नमन मंडळ पाठवली यांचा बहारदार नमनाचा कार्यक्रम होणार असून याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विष्णू चाळके, उपाध्यक्ष दिलीप चाळके, सचिव दिनेश रावण यांनी केल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg