loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपच्या प्रा. रुपाली दांडेकर चिपळूणच्या नव्या उपनगराध्यक्ष

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रूपाली दांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेनेकडून विक्रांत लवेकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून फैसल कासकर आणि भाजपकडून शीतल रानडे यांची नियुक्ती करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने रूपाली दांडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केली. त्यानंतर स्वीकृत सदस्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.यानंतर सफा गोठे, उदय जुवळे, अंकुश आवले, रसिका देवळेकर, साजिद सरगुरोह यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विकी नरळकर यांनी मनोगत व्यक्त करताना आम्ही उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. सत्ताधारी व विरोधक असा भेद न ठेवता नगरहितासाठी काम व्हावे, असे मत व्यक्त केले. भाजपचे गटनेते शशिकांत मोदी यांनीही मनोगत व्यक्त करताना, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्वांनी एकदिलाने चांगल्या पद्धतीने काम करूया, असे सांगितले. स्वीकृत सदस्य फैसल कासकर व विक्रांत लवेकर यांनी पक्षाने संधी दिल्याबद्दल आभार मानले. उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांनी, आजपर्यंत मी प्राध्यापक म्हणून काम करत होते, मात्र आता अभ्यासक्रम बदलला आहे. आता लोकांसाठी काम करायचे आहे. आपले कामच बोलणारे असावे, असे सांगितले.

टाइम्स स्पेशल

शेवटी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मनोगत व्यक्त करताना, एकट्याने स्वप्न पूर्ण होत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम करूया. सत्ताधारी-विरोधक असा भेद राहणार नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, असे काम करूया, असे आवाहन केले.या सभेला सर्व नगरसेवकांसह मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, सभा कामकाज लिपिक संतोष शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg