loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूख नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी सेनेचे वैभव पवार , आणखी स्वीकृत सभाडा कोण ?

देवरूख सुरेश सप्रे : देवरूख नगरपंचाय निवडणूकीत सेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीने दणदणीत विजय मिळवून सत्ता काबीज केली होती. आता उपनगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवक पदासाठी उद्या दि १५रोजी निवडणूक लागली आहे. प्रथम उपनगराध्यक्ष निवड होईल. त्यानंतर दोन स्विकृत सदस्य निवडले जाणार आहेत. देवरूख नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे वैभव पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून ते उद्या सकाळी १०वा.आपले नामांकन दाखल करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महायुतीकडे बहूमत असल्याने उपनगराध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.तर स्विकृत सदस्य पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे चार व अपक्ष तीन नगरसेवक यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असल्याची माहिती मिळात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या गटातून आम. शेखर निकम यांच्या आशीर्वादाने प्रभाग १२मधून अपक्ष निवडणूक लढवत पराभूत झालेले सागर संसारे यांची निवड होणार असल्याचे वृत आहे. भाजपा सेना युती कडून स्विकृत सदस्य पदाची लाँटरी रूपेश भागवत याला लागली आहे.

टाइम्स स्पेशल

नगरपंचायतीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आता या काळात तरी शहर विकास आराखडा मंजूर होईल का? याकडे ही जनतेचे लक्ष लागले आहे..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

राष्ट्रवादीचे चार व अपक्ष तीन नगरसेवक यांचा स्वतंत्र गट स्थापन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg