loader
Breaking News
Breaking News
Foto

जेसीआय खेडचे अध्यक्ष JFM अमित नामुष्टे यांना “अनस्टॉपेबल प्रेसिडेंट अवॉर्ड”

खेड (प्रतिनिधी) : जेसीआय खेडचे गतिमान व बहुआयामी अध्यक्ष JFM अमित नामुष्टे यांनी पुन्हा एकदा संस्थेचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. विशाखापट्टणम येथे भव्यदिव्य वातावरणात आयोजित प्रेसिडेन्शियल अकॅडमी या राष्ट्रीय समारंभात “Unstoppable President Award” हा मानाचा पुरस्कार JCI India चे राष्ट्रीय अध्यक्ष JFG भारत आचार्य यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा पुरस्कार मिळवणे म्हणजे नेतृत्व, कार्यतत्परता, नवोन्मेषी उपक्रम आणि संघटन कौशल्य याची राष्ट्रीय पातळीवरील ठोस पावती आहे. गेल्या वर्षभरात जेसीआय खेडच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृती उपक्रमांना नवे दिशा-विन्यास मिळवून देण्यात अध्यक्ष अमित नामुष्टे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली खेडमध्ये युवकांसाठी रोजगारक्षम प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महिलांसाठी उद्योजकता उपक्रम तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली. या सर्व उपक्रमांच्या भक्कम कामगिरीची दखल घेत JCI India ने त्यांना “Unstoppable President” हा प्रतिष्ठेचा किताब देऊन सन्मानित केले. कार्यक्रमावेळी सभागृहात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.

टाइम्स स्पेशल

देशभरातील अनेक जेसीआय शाखांचे पदाधिकारी, सदस्य व मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्विकारताना अमित नामुष्टे यांनी जेसीआय खेडच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले तसेच त्यांच्या सोबतीने काम करणाऱ्या प्रत्येक सदस्यामुळेच हा सन्मान शक्य झाल्याचे सांगितले. या उल्लेखनीय यशाबद्दल जेसीआय खेडच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत असून हा सन्मान खेड तालुक्यासाठीही अभिमानास्पद ठरला आहे. समाजकार्यातून युवाशक्तीला सकारात्मक दिशा देणाऱ्या उपक्रमांना पुढील काळात अजून मोठ्या प्रमाणात गती देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg