loader
Breaking News
Breaking News
Foto

खर्डेकर महाविद्यालयात 'नादब्रह्म'चा जयघोष; भाजप नेते विशाल परब व वेदिका परब यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

वेंगुर्ले (प्रतिनिधी) - वेंगुर्ला येथील प्रतिष्ठित बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव 'नादब्रह्म २०२६' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब आणि वेदिका परब यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विशाल परब आणि वेदिका परब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, युवा महोत्सव समितीचे चेअरमन प्रा. पी. एम. देसाई, प्रा. विवेक चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. हराळे, L.M.C. मेंबर सुरेश खामकर, तुळसचे माजी सरपंच विजय रेडकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासच नव्हे, तर कला आणि क्रीडा क्षेत्रातील सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. कोकणातील तरुणांमध्ये अफाट टॅलेंट असून 'नादब्रह्म' सारखी व्यासपीठे त्यांना आपली कला जगासमोर मांडण्याची मोठी संधी देतात." वेदिका परब यांनीही उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांना विविध क्षेत्रांत भरारी घेण्याबाबत प्रोत्साहित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विशाल परब यांनी भविष्यातील वाटचालीवर भाष्य केले. ते म्हणाले की आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. मला खर्डेकर कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकच सांगावेसे वाटते की प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे ध्येय आत्ताच ठरवले पाहिजे. मी डॉक्टर होणार, वकील होणार, मोठा उद्योजक होणार की राजकारणी होणार, याचा एक ठाम निश्चय तुमच्या मनात हवा.

टाइम्स स्पेशल

या सोहळ्याला विद्यार्थी प्रतिनिधी नित्यानंद वेंगुर्लेकर, हिना बागवे, विद्यार्थी मंडळ सचिव कादंबरी मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. विशाल परब यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संपूर्ण परिसरात 'नादब्रह्म'च्या निमित्ताने एक चैतन्यमयी वातावरण पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg