loader
Breaking News
Breaking News
Foto

भूतनाथ किनार्‍यावर कचरा टाकताय....मग कारवाईला तयार रहा

मालवण (प्रतिनिधी) वायरी भूतनाथ गावच्या किनारपट्टीवर कचर्‍याचा प्रश्न गंभीर झाला होता. या कचर्‍यासंदर्भात कारवाई करण्यासाठी जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचर्‍याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत वायरी ग्रामपंचायतीने दखल घेत किनार्‍यावर फलक लावून कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. वायरी भूतनाथ येथील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, बाटल्या, टाकावू अन्नपदार्थ टाकण्यात येत होते. यामुळे किनारपट्टीचे सौंदर्य बिघडून परिसरात अस्वच्छता पसरली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी ग्रामपंचायतीचे लक्ष वेधत कचर्‍याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. यानंतर वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने किनारपट्टीवरील कचरा उचलून साफसफाई केली आहे. तसेच याठिकाणी ग्रामपंचायतीकडून सुचनेचा फलक लावण्यात आला आहे. त्यानुसार सदर परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली असून कचरा टाकल्यास कचरा टाकणार्‍यावर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर कचरा करणार्‍या व्यक्ती निदर्शनास आणून देणार्‍याला २०० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सरपंच भगवान लुडबे यांनी दिली आहे. त्यामुळे आता किनारपट्टीवर कचरा टाकताय....मग ग्रामपंचायतीच्या कारवाईला तयार रहा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg