loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज अस्तित्वासाठी एकवटला

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील बौद्ध समाज सर्व गट तट आणि सर्व राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्र आला. शृंगारतळी येथे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एकीचे दर्शन घडवून दिले आहे. गुहागर तालुक्यातील हा ऐतिहासिक निर्णय बौद्ध समाजाच्या भावी पिढीसाठी मार्गदर्शक आणि तारणहार ठरणार आहे. हे ऐक्य बौद्ध समाजाचे अस्तित्व टिकवणारे असून बौद्ध समाज बांधवांनी या ऐक्यात संघटित राहण्याचा निर्धार केला आहे. लवकरच गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आप्पा कदम, सिद्धार्थ जाधव, विजय असगोलकर, सुनील जाधव, उज्वल पवार, संदीप पवार यांनी आपले विचार मांडले शेवटी अध्यक्ष भाषणात एस. एल. सुर्वे यांनी बौद्धांचे अस्तित्व टिकवणारे आपण सगळ्यांनी केले पाहिजे असे सांगून मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी गुहागर तालुका बौद्ध समन्वय समिती स्थापन करण्याची भूमिका मांडण्यात आली. या समाज बांधवांनी पाठिंबा दिला. यावेळी विचार पिठावर आप्पा कदम, सिद्धार्थ जाधव, एस. एल. सुर्वे, सुनील जाधव, विजय असगोलकर, काशिनाथ सुर्वे, महेंद्र आप्पा कदम, भीमसेन सावंत आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुहागर तालुक्यातील बौद्ध संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg