loader
Breaking News
Breaking News
Foto

तिरडीवर ठेवताच ९९ वर्षाच्या आजी उठून बसल्या

नागपूर - जगात अशा काही घटना विचित्र घडतात यामुळे सार्‍यांनाच धक्का बसत असतो. रामटेक शहरातील आंबेडकर वार्डात राहणार्‍या गंगाबाई सावजी साखरे या ९९ वर्षाच्या आजी मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु झाली. नातेवाईकांची रडारड सुरु होती. या आजीबाईंची पुण्याई फारच मोठी होती. त्यामुळे सर्वच उपस्थित लोकांनी आजीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. फोनवरुन रामटेक परिसरात आजीच्या निधनाची बातमी पसरली आणि सकाळी दहा वाजता आजीला स्मशानभूमित नेण्याची तयारी सुरु झाली. सार्‍यांनीच दर्शन घेतले. सर्व लोक अश्रू ढाळत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुटुंबियांनी आजीचा मृतदेह उचलून तिरडीवर ठेवताच ९९ वर्षाच्या आजी तिरडीवरच उठून बसल्या. लोकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. नेमका त्याच दिवशी आजीबाजीचा वाढदिवस होता. त्यामुळे आजी उठून बसल्याचे पाहताच अनेकांनाच घाम फुटला. रडणे बाजूलाच राहिले आणि ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंत्यविधीची तयारी थांबवण्यात आली आणि कुटुंबियांनाही आजी असल्याचा आनंद झाला. अशा धक्कादायक घटना घडतच असतात.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg