loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत वराडकर हायस्कुल कट्टाचे कला शिक्षक समीर चांदरकर यांचा प्रथम क्रमांक

मालवण (प्रतिनिधी) - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यावतीने हिंगोली येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्री.चांदरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील अध्यापन प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी डिजिटल शिक्षण या विषयावर आधारित साकारलेल्या रांगोळीला मालवण तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर त्यांची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली होती. सांगली येथे संपन्न झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेतही समीर चांदरकर हे विजेते ठरल्याने त्यांची निवड हिंगोली येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील आठ शैक्षणिक विभागातील विजेते ठरलेल्या तब्बल चाळीस स्पर्धकांचा समावेश होता. या चाळीस स्पर्धकांशी झालेल्या स्पर्धेतून समीर चांदरकर यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

टाइम्स स्पेशल

हिंगोली येथे भा. मे. पुंटवाड प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली, जगदीश करडे राज्य समन्वयक/अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोलीच्या जयश्री आठवले, स्पर्धा समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हिंगोली यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.चांदरकर यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. श्री.चांदरकर यांचे सिंधुदुर्ग माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, वराडकर हायस्कूल कट्टाच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर तसेच संस्था चालक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg