loader
Breaking News
Breaking News
Foto

संक्रांतीनंतर गारठा वाढणार.. उत्तरेत हाडं गोठवणारी थंडी; तर महाराष्ट्रात थंडी-पावसाचा लपंडाव

मुंबई : देशभरात मकर संक्रांती सुरू असतानाच हवामानातही लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. उत्तर भारतात धुक्याची चादर अद्याप कायम असून, त्यामुळे केंद्रीय हवामान विभागाने अनेक उत्तरेकडील राज्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा जारी केला आहे. धुक्यामुळे उत्तर प्रदेश, बिहारसह मध्य भारतात दळणवळणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात थोडी वाढ झाली असली आणि उकाडा जाणवत असला, तरी हा दिलासा तात्पुरता असल्याचे दिसत आहे. आज 14 जानेवारी रोजी ही स्थिती कायम राहणार असली, तरी उद्या 15 जानेवारीपासून राज्याच्या किमान तापमानात पुन्हा एकदा मोठी घट होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण भारताकडे कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होत असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. यामुळे राज्यात तापमानात सातत्याने चढ-उतार होत असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांत किमान तापमानात काही अंशांनी वाढची नोंद झाली आहे. मात्र पुढील 24 तासांनंतर पुन्हा तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.गेल्या 24 तासांत धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, येथे पारा थेट 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. तर नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्ये किमान तापमान 11 अंशांवर स्थिरावले होते. पुढील 24 तासांत या स्थितीत फारसा बदल होणार नसून, राज्याच्या काही भागांत गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका पुढील काही दिवस राहणार आहे.

टाइम्स स्पेशल

राज्यातील कोकण किनारपट्टी, ठाणे, रायगड आणि पालघर भागात दमट हवामान वाढण्याची शक्यता असून, पहाटेचा गारठा वगळता थंडीचा प्रभाव कमी होताना दिसेल. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.उत्तर आणि दक्षिणेकडील हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रावर सध्या संमिश्र परिणाम दिसून येत असून, कुठे कडाक्याची थंडी तर कुठे दमट वातावरण, तर काही भागांत ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg