loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसेवक प्रतिष्ठान'च्या कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी दिलीपराव जाधव यांची निवड

आबलोली (संदेश कदम) - ज्यांच्या कार्याचा सुगंध केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात दरवळत आहे, अशा एका धडाडीच्या नेतृत्वाची दखल आता राज्य पातळीवर घेण्यात आली आहे. गुहागर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष दिलीपराव जाधव यांची 'महाराष्ट्र राज्य जनसेवक प्रतिष्ठान'च्या 'कोकण विभागीय संपर्कप्रमुख' पदी अत्यंत सन्मानाने निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिलीपराव जाधव यांनी आजवर सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या याच प्रामाणिक आणि निस्वार्थी जनसेवेची दखल घेऊन, जनसेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पिंटू (भाऊ) गोरे यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.

टाइम्स स्पेशल

जाधव यांची कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याचे वृत्त समजताच गुहागरसह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. "लोकाभिमुख काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जेव्हा मोठे व्यासपीठ मिळते, तेव्हा समाजकारणाला अधिक गती मिळते. दिलीपराव जाधव यांच्या निवडीमुळे कोकणात जनसेवक प्रतिष्ठानचे कार्य अधिक जोमाने वाढेल," अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg