loader
Breaking News
Breaking News
Foto

हळवल फाटा वळणावर मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी; एक गंभीर जखमी

कणकवली (प्रतिनिधी)- मुंबई—गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली नजीक हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. पुण्याहून गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून साईटला बसलेला एक जण सुखरूप आहे. मात्र एका किन्नरच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर ट्रकमधील मैद्याची पोती रस्त्यावर विखुरल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघातातील जखमींना तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा येथील बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे. हळवल फाट्यावरील हे वळण अपघातप्रवण असून याच ठिकाणी यापूर्वीही अनेकदा अशाच स्वरूपाचे अपघात झाले आहेत. या वळणावर बसवण्यात आलेली स्पीड ब्रेकर अपघाताला निमंत्रण देणारी ठरत असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

पुलाच्या सुरुवातीलाच स्पीड ब्रेकर बसवण्यात आल्यास अपघातांना आळा बसेल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस एकनाथ सरमळकर, निलेश सोनावणे, मंगेश साटम, प्रशांत कासले आदी अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या मैद्याच्या पोत्यांमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच रात्रीची वेळ असल्याने ही पोती चोरीला जाऊ नयेत. म्हणून महामार्ग पोलिसांना रात्रभर घटनास्थळी पहारा द्यावा लागल्याची माहिती उपस्थितांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg