loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरूड जंजिरा न.प. उपनगराध्यक्षपदी विरेंद्र भगत यांची बिनविरोध निवड

मुरुड (राजीव नेवासेकर) - मुरूड जंजिरा नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदाकरीता शिवसेना शिंदे पक्षांकडून विरेंद्र दत्तात्रेय भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी विरेंद्र दत्तात्रेय भगत यांना उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. तसेच स्वीकृत नगरसेवक पदाकरिता अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून मनोज हरिश्चंद्र भगत तर शिंदे शिवसेना पक्षांकडून ऍड.रूपेश शंकर पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दोन्ही नगरसेवक निवडून आल्याचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी घोषित केले. यावेळी मुख्याधिकारी सचिन बच्छाव उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांना पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा आराधना दांडेकर व मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तद्नंतर उपनगराध्यक्ष दालनात येऊन विरेंद्र भगत यांनी पदग्रहण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, महिला जिल्हा प्रमुख-तृप्ती पाटील, शहर प्रमुख -संदिप पाटील, माजी नगराध्यक्ष - स्नेहा पाटील, हर्षला विरेंद्र भगत, श्रीकांत सुर्वे, नगरपरिषदेचे गटनेते पांडुरंग आरेकर, नवनिर्वाचित नगरसेवक मनिष विरकुड, रुपेश रणदिवे, नितिन आबुर्ले, विजय पाटील, नगमाना खानजादे, अंकिता गुरव, सुगंधा मकु, श्रीकांत खोत, यास्मिन कादिरी, प्रिती चौलकर, आदेश दांडेकर, रुपेश पाटील, श्रध्दा अपराध, देवयानी गुरव, प्रमिला माळी, तमीम ढाकम, प्रांजली मकु, आशिष दिवेकर, दिपेश वरणकर, युगा ठाकुर, गिरीश साळी, मेघाली पाटील, रहिम कबले आदिंसह शेकडो शिंदे शिवसेना पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मोठी संधी देऊन मला उपनगराध्यक्षपदी विराजमान केले त्याबद्दल आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांनी आभार मानून सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या कामाची गरज आहे हे ओळखूनच विकासाचे पाऊल उचलणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून नगरपरिषदेसाठी अधिकाधिक निधी आणून शहराचा विकास करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर जात-धर्म न पाहता सर्व एकत्र येऊन शहराचा विकास करुया, असे नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg