loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे गावठी आठवडा बाजार

मालवण (प्रतिनिधी) - ग्रामीण भागात पिकवली जाणारी विविध धान्य तसेच तयार होणारी विविध उत्पादने यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान, विक्री कौशल्य विकसित व्हावे व त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या गावठी आठवडी बाजाराचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर आणि संस्थेचे सहसचिव साबाजी गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाईक, मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गावठी आठवडी बाजारात गावठी उकडे तांदूळ, गावठी सुरय तांदूळ, कुळीथ, चवळी, वालीचे गर, नाचणी, शेंगा, कोकम, आगळ, खोबरेल तेल, गावठी हळद, गावठी अंडी, पिठी, घावणे पीठ, वडे पीठ, कणगी, करांदे, सुरण, नारळ, शहाळी, सुके खोबरे, गावठी भाज्या, बांबू उत्पादने, मातीच्या वस्तू खरेदी करत परिसरातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर स्काऊट गाईड विभागामार्फत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करत स्वतः अर्थार्जनाचे धडे घेतले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त - कर्नल शिवानंद वराडकर, ऍडव्होकेट एस.एस.पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर तसेच सर्व संचालक व संचालिका यांनी या स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg