loader
Breaking News
Breaking News
Foto

नमन लोककला संस्था, शाखा गुहागरच्यावतीने गोविंद आंबेकर यांचा सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - नमन लोककला संस्था, तालुका शाखा गुहागर यांच्यावतीने गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथील जेष्ठ कलाकार गोविंद गोपाळ आंबेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नमन कलेतील जेष्ठ कलाकारांचा सन्मान गुहागर येथे भंडारी सभागृहात संपन्न झाला. ज्येष्ठ कलाकार व स्त्रीपात्र साकारणाऱ्या गोविंद गोपाळ आंबेकर यांचा नमन लोक कला संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रम प्रसंगी गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नीता मालप , माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, नगरसेवक प्रदीप बेंडल, अरुण परचुरे,मानधन समिती सदस्य अमरदीप परचुरे, नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, संदीप कानसे, सुधीर टाणकर, प्रमोद घुमे, मनसे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, मुकुंद आंबेकर, राधा आंबेकर, सानिका माटल ,नात वैष्णवी, नातू शाम तसेच पोलीस पाटील वासंती आंबेकर व सरपंच जनार्दन आंबेकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

ज्येष्ठ लोक कलाकार गोविंद गोपाळ आंबेकर हे लहानपणापासून शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे, अभिनय, अवांतर वाचन, लिखाण, गायण, हार्मोनियम वादन व गाणे सराव करणे, इतरांना कलेचे प्रशिक्षण देणे असे सेवाभावी काम करत होते. नमनातील पौराणिक, धार्मिक, सामाजिक वगनाट्य लेखन. तसेच भारूड व विनोदी फार्स लेखन त्यांनी केले आहे.नमनाचे गीत रचना व संगीत,दिग्दर्शन,प्रमुख स्त्रीपात्र भुमिका यामध्ये खास भूमिका म्हणजे पंचरंगी गवळण (एकाच गाण्यात एक ते दीड मिनिटात ५ ते ७ साड्या व नखशिखांत पुर्ण पेहराव म्हणजेच साडी, चोळी, बांगड्या, वेणी, कर्णफुले, गंध (टिकली) इत्यादी पुर्णपणे बदलून सांज श्रृंगार करून अभिनय करणे हे त्यांच्याकडे विशेष कला आहे.नमनामध्ये ट्रीकसीन दाखविणे. नमनासाठीचे साहित्य उदा. गदा, मुकुट, मुखवटे, विणा, इत्यादी स्वत: तयार करणे. भजन कार्यक्रम करणे.मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती व समाज प्रबोधन करणे.नवीन पिढीतील तरूणांना कलेचे प्रशिक्षण देणे. श्री गणेशांच्या भाद्रपद उत्सवामध्ये श्री गणेश मुर्ती तसेच नवरात्रौमध्ये देवीची मूर्ती तयार करणे. आदी कला त्यांना पारंगत आहेत. स्त्रीपात्र म्हणून प्रमुख भूमिका करण्यास सन १९७० पासून सुरूवात करून २०१८ पर्यंत वयाच्या ६८ व्या वर्षांपर्यंत एकूण ४५ वर्षे नमन कलाक्षेत्रात सक्रिय प्रबोधन व मनोरंजन सेवा केली आहे.अनेक धार्मिक आणि पौराणिक वगनाट्यांचे स्वत: लेखन, दिग्दर्शन, गीत रचना, संगीत आणि स्वत: प्रत्येक वगनाट्यांतील मुख्य स्त्रीपात्र भुमिका केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg