loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्गात महायुतीचा जागावाटप फॉर्मुला ठरला

कणकवली (प्रतिनिधी)- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या तीन पक्षांची महायुती झाली असल्याचे खास. नारायण राणे यांनी जाहीर केले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्मुला यावेळी खास. नारायण राणे यांनी स्पष्ट केला. जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपा 31 तर शिवसेना 19 जागा लढविणार आहे. तर पंचायत समितीच्या 100 जागांपैकी भाजपा 63 आणि शिवसेना 37 जागा लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचाही महायुतीत सहभागी होण्याचा प्रस्ताव आल्यामुळे त्यांना देखील समाधानकारक जागा देण्यात येतील अशी माहिती देतानाच जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे भाजप तीन वर्ष आणि शिवसेना दोन वर्ष असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती भाजपनेते खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी पत्रकार परिषदेत भाजपा नेते खास.नारायण राणे राणे बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना.नितेश राणे, आम. निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संजय पडते, संदीप कुडतडकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, सचिन वालावलकर, महेश सारंग आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

खास. नारायण राणे म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात भाजपा पक्षाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या 11 तर शिवसेना ६ जागा लढविणार आहे. तर पंचायत समितीच्या भाजप 17 आणि शिवसेना 17 जागा लढविणार आहे. कुडाळ - मालवण मतदारसंघात भाजप ४ आणि शिवसेना 11 जागा लढविणार आहे. तर पंचायत समितीच्या भाजपा 15 आणि शिवसेना 15 जागा लढविणार आहे. कणकवली मतदारसंघात भाजप जिल्हा परिषदेच्या 16 आणि शिवसेना 2 तर पंचायत समितीच्या भाजप 31 आणि शिवसेना 5 जागा लढविणार आहे अशी माहिती खास. नारायण राणे यांनी दिली. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रस्ताव आलेला असून त्यांचाही समावेश या निवडणुकीत काही प्रमाणात जागा देऊन करण्यात येणार असल्याचे खास. राणे म्हणाले. आमच्यासमोर कुणी विरोधकच नसल्याने शंभर टक्के महायुतीचा विजय निश्चित असल्याचे खास. राणे यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg