loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शहर सज्ज

मुंबई :संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक पूर्वसंध्येला शहरात कडक बंदोबस्त तैनात केलेला दिसून येत आहे. गेले पंधरा दिवस मुंबई शहरात राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडविला. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकींचा प्रचार मंगळवारी थंडावला. यामध्ये लक्षवेधी ठरत आहे ती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. मराठी आणि अमराठीच्या मुद्द्यावरुन ही निवडणूक गाजत आहे. तसेच मुंबईचे महापौरपद आणि मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख यावरुन बराच वाद रंगलेला पहायला मिळाला. दरम्यान, कडेकोट बंदोबस्तात उद्या (15 जानेवारी) मतदान; तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. दोन्ही बाजूकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. शिवसेनेच्या मतांची विभागणी होण्याची शंभर टक्के शक्यता आहे , त्याचा फायदा कोणाला होईल हे 16 तारखेला कळणारच आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 25 हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 10 अॅडिशनल कमिश्नर्स, 33 डीसीपी, 84 एसीपी यांच्यासोबत होमगार्ड्स, एसआरपीएफ आणि क्विक रिस्पॉन्स टीम्सचा समावेश आहे.

टाइम्स स्पेशल

राज आणि उद्धव ठाकरे हे दशकभराच्या दुराव्यानंतर एकत्र आल्याने ही निवडणूक खास ठरली आहे. दोघांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन रान पेटवले आहे; तर 2022 मध्ये शिवसेनेतील फूटीनंतर एकनाथ शिंदे यांचादेखील या निवडणुकीत कस लागणार आहे. फडणवीसांनी हिंदू आणि मराठी महापौरपदाचे आश्वासन देत निवडणुकीला भावनिक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीसाठी भाजप 137 आणि शिवसेना शिंदे गट 90 जागा लढवत आहे; तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 94 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना ठाकरे गट 163 आणि मनसे 52 जागांवर लढत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही निवडणुक एकत्रित लढवत आहेत. काँग्रेसने 143; तर वंचितने 46 उमेदवार उभे केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg