loader
Breaking News
Breaking News
Foto

मुर्शी येथील तिहेरी अपघातात चार जण जखमी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील मुर्शी जवळील गोवरेवाडी फाट्यानंजिक तीन वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सिद्दीक अय्याज मुल्ला वय २६ रा.कराड हे आपल्या ताब्यातील एम एच ५० एम ५७७७ बोलेरो पीकप गाडी कराड ते रत्नागिरी असा जात असताना गाडीवरील ताबा सुटल्याने मुर्शी जवळील गोवरेवाडी रोडजवळ इको गाडीला (एम एच ११डी ए 5275) जोरदार धडक दिली व इको गाडी गंगाराम तुकाराम शिंदे वय सुमारे ६२ हे चालवीत असलेल्या रिक्षावर (एम एच ०८ इ ८४३८) जोरदार धडकली, रिक्षा पलटी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे रिक्षातील शाळेतील मुले व अंगणवाडी सेविका व रिक्षाचालक जखमी झाला. यामध्ये गंगाराम तुकाराम शिंदे वय ६२ राहणार कोंडगाव, तन्वी राजू कांबळे वय ११, स्वरा सचिन कांबळे वय १२, राहणार दक्खन बौधवाडी, दीपाली दिलीप कनावजे वय ५५ राहणार मुर्शी, अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांना प्रथम साखरपा रुग्णालयात व त्यानंतर रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच साखरपा दूरक्षेत्राचेसहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी जाऊन अपघाताची पूर्ण चौकशी करून पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg