loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्माण मॅरेथॉनमध्ये ७०० हून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : नवनिर्माण महाविद्यालय संगमेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ’नवनिर्माण मॅरेथॉन’ स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील आणि परिसरातील सुमारे ७०० स्पर्धकांनी विविध वयोगटांत सहभागी होऊन आपली शारीरिक क्षमता आणि जिद्दीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत ऋषभ दसम, राज धुळप, दीपाली शिंदे आणि गौरी कदम यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावत विजयावर शिक्कामोर्तब केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे - १६ वर्षांखालील मुलांचा गट: प्रथम: ऋषभ धोंडू दसम, द्वितीय: आदर्श मंगेश भुवड, तृतीय: आर्यन अनंत बालदे, चतुर्थ: प्रसाद दीपक सुवरे १६ वर्षांखालील मुलींचा गट: प्रथम: दीपाली प्रमोद शिंदे, द्वितीय: गौरी दत्ताराम शीतप, तृतीय: प्रांजल संदीप घुगे, चतुर्थ: वैदेही उमेश देवलाटक खुला गट (पुरुष): प्रथम: राज सुरेश धुळप, द्वितीय: शुभम अनिल शीतप, तृतीय: विशाल रामचंद्र लटके, चतुर्थ: करण कृष्णा नटे खुला गट (महिला): प्रथम: गौरी सुरेंद्र कदम, द्वितीय: अमिषा यशवंत पवार, तृतीय: सानिया गणपत बडद, चतुर्थ: सानिका संतोष सनगले स्पर्धेच्या सांगता समारंभात विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरविण्यात आले. खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार आणि ५०० रुपये, तर लहान गटातील विजेत्यांना अडीच हजार, दीड हजार, १ हजार आणि ५०० रुपये रोख पारितोषिक देण्यात आले. या सोहळ्याला नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, सीमा हेगशेट्ये, ऋतुजा हेगशेट्ये, पोलीस निरीक्षक उदय झावरे, राजाराम चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते, तसेच बापू शेट्ये, बापू शिंदे, उदय संसारे, दिलीप रहाटे, अशोक जाधव, युयुत्सु आर्ते, प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

खेड्यापाड्यातील गुणवंत धावपटूंना व्यासपीठ मिळावे आणि भविष्यात उत्तम खेळाडू तयार व्हावेत, यासाठी ही स्पर्धा ’माईलस्टोन’ ठरेल. अभिजीत हेगशेट्ये (चेअरमन, नवनिर्माण शिक्षण संस्था) ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक संतोष साळुंखे, उदय गावडे, प्रमोद पडवळ, सुरेंद्र कुळे, योगेश पाचकळे आणि अभिजीत कदम यांनी पंच म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. आरोग्याप्रती जागरूकता आणि शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

संगमेश्वरमध्ये क्रीडामय वातावरण

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg