loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ब्राऊन हेरॉईनसह चौघांना अटक; ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत NDPS कारवाई

रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या मिशन फिनिक्स मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने NDPS कायद्यान्वये कारवाई करत 30 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन सदृश अंमली पदार्थासह चार जणांना ताब्यात घेतले असून, सुमारे 3 लाख 61 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक रत्नागिरी शहर परिसरात शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत असताना सिव्हिल हॉस्पिटल ते निवखोलकडे जाणाऱ्या रस्त्यावर, सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंडजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तपासणीदरम्यान आरोपींच्या ताब्यातून 30 ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन सदृश अंमली पदार्थ, तसेच इतर साहित्य मिळून आले. याप्रकरणी पुढील व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे — ताहीर रफीक कोतवडेकर (रा. रुबी अपार्टमेंट, थिबा पॅलेस रोड), रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा), आकीब जिक्रीया वस्ता (रा. राजीवडा, मच्छी मार्केटजवळ) आणि रफत करीम फणसोपकर (रा. जुने मच्छी मार्केट, राजीवडा), सर्व रा. रत्नागिरी. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोहवा. 251 शांताराम झोरे, पोहवा. 909 विजय आंबेकर, पोहवा. 1407 दिपराज पाटील, पोहवा. 262 विवेक रसाळ, पोहवा. 265 योगेश नार्वेकर व पो.कॉ. 215 अतुल कांबळे यांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg