loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकनेते शामरावजी पेजे जयंतीचे औचित्य साधून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी (प्रतिनिधी) - कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई (ग्रामीण शाखा रत्नागिरी) तर्फे लोकनेते शामरावजी पेजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. 17 जानेवारी 2026 रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये शनिवारी सकाळी 10.30 वा. लोकनेते शामराव पेजे यांच्या स्मारकाला पुष्पहार अपर्ण करणे. सकाळी 11.00 वा. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, ग्रामीण शाखा रत्नागिरी तालुका कार्यालयाचे उद्घाटन., कुणबी भवन, रम्य नगर, जे. के. फाईल्स जवळ, रत्नागिरी येथे होणार आहे. त्यानंतर येथे सकाळी 10.30 वा. लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी यांचा संयुक्तीत शिष्यवृत्ती वाटप आणि मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर दुपारी 12.00 वा. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संचलित कै. रामा देवजी ढेपसे मुलींच्या वसतीगृहातील विद्यार्थीनींची रांगोळी स्पर्धा होणार आहे. सायं. 4.00 वा. कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरी तालुका महिला मंडळ आयोजित हळदीकुंकू समारंभ, तर 4.30 वा.‘पैठणीचा' हा महिलांसाठी कार्यक्रम कुणबी समाजोन्नती संघ आणि जिजाउ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी यांयावतीने आयोजित केला आहे. सायं. 6.30 वा. मुलींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी समाज बंधू व भगिनींनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष रामभाऊ गराटे, युवा अध्यक्ष अ‍ॅड. सागर कळंबटे, महिला अध्यक्षा विनया गावडे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg