loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. नंदकुमार तावडे यांचे निधन

दापोली - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार तावडे यांचे त्यांच्या गिम्हवणे येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुले, बंधु, वहिनी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ. तावडे ह्यांनी कृषी विस्तार विषयाचे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख या पदांवर काम करताना आपली वेगळी कार्यशैली निर्माण केली. अध्यापन, संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार या तिन्ही क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. याशिवाय, महाविद्यालयाच्या सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचे मोठे योगदान होते. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना पथकांचे नेतृत्व त्यांनी केले. डॉ. तावडे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे आणि शास्त्रीय नियतकालिकांचे सदस्य व पदाधिकारी होते. देशातील अनेक कृषी विद्यापीठातील कृषी विस्तार विषयाचे पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्रबंधांचे मूल्यमापन त्यांनी केले. याशिवाय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका काढणे व उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्यांना निमंत्रित केले जायचे. डॉ. तावडे ह्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी मार्गदर्शन केले. शास्त्रीय व कृषीविषयक नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये लेख प्रकाशित केले. कृषी महाविद्यालय आणि कोकण कृषी विद्यापीठांतर्गत विद्यार्थी परिषद, अभ्यास मंडळे, विद्याशाखा, विद्या परिषद आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य व पदाधिकारी म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. तावडे ह्यांच्या निधनामुळे राज्याच्या आणि देशाच्या कृषी आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. अरविंद सावंत, डॉ. विजय मेहता,डॉ. संजय सावंत, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, नाबार्डचे माजी प्राध्यापक डॉ. नाथ शेटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गजानन सावंत,भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी सहायक महासंचालक डॉ. नारायण जांभळे इत्यादी मान्यवरांनी शोकसंवेदना कळविल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg