loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेत श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय लांजाचे दैदीप्यमान यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय क्रीडा समितीच्यावतीने आयोजित कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री (मुले व मुली) स्पर्धा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी तळा येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजन द. ग. तटकरे महाविद्यालय, तळा जिल्हा रायगड यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मुंबई विद्यापीठाशी संलग्न एकूण २१ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत एकूण ५० मुले व ३० मुली सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा येथील मुले संघाने सांघिक विजेतेपद प्रथम क्रमांक, तर मुली संघाने सांघिक विजेतेपद प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या दमदार कामगिरीमुळे महाविद्यालयाचे मुले व मुलींचे संघ सलग चौथ्या वर्षी सांघिक विजेतेपदाचे मानकरी ठरले असून दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले. वैयक्तिक स्पर्धेत निशा कुदळे हिने सुवर्णपदक, तर हर्षदा पांचाळ व शिवम कुलाल यांनी कांस्यपदकांची कमाई केली. याशिवाय ध्रुविका माजळकर, महेंद्र कुडकर व संकेत पाजावे यांची पुढील मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक शशांक उपशेटे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी भाऊ वंजारे, कार्याध्यक्ष जयवंतभाऊ शेट्ये, उपकार्याध्यक्ष सुनिल ऊर्फ राजू कुरूप, सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये, तसेच सर्व सन्माननीय संचालक व सल्लागार मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच प्राचार्य, क्रीडा शिक्षक यांनीही अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg