loader
Breaking News
Breaking News
Foto

महाआघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची राष्ट्रवादी काँग्रेसची (शप) तयारी - बारक्याशेठ बने

देवरूख (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उबाठा व मनसे वंचित बहूजन आघाडी सोबत महाआघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तालुक्यातील सात जिप गट व चौदा पं. स. गणापैकी एक जि.प. गट व तीन ते चार पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर तालुक्यात उबाठाची ताकद जास्त आहे. त्यातच आता मनसे व वंचित बहूजन आघाडीला सोबत घेऊन या निवडणुकीत ताकदीनिशी उतरून पंचायत समितीवर महा आघाडीचा झेंडा फडकविण्यात यशस्वी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धामापूर गट व साडवली, हातीव, दाभोळे गण मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त करून साडवली गणात आर्या लोकम या उच्च शिक्षित महीला तर हातीव गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष व तंटामुक्ती अध्यक्ष रेहान गडकरी, दाभोळे गणातून कोलापटे हे सामाजिक कामात अग्रेसर असलेले व चांगले काम करणाऱ्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही आग्रही भूमिका घेतली असून आम्ही महाआघाडीचा माध्यमातून ही निवडणूक लढविणार असल्याचे बने यांनी स्पष्टपणे सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg