loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्यात भाजप आणि मनसे कार्यकर्ते भिडले ; रोड शोदरम्यान तुफान राडा

पुणे: : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आमने-सामने आल्याने शहरात मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात आज मनसेकडून भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचं रुपांतर राड्यात झालं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनसेचा रोड शो शहरातील प्रमुख मार्गांवरून जात असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांशी घोषणाबाजीवरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी धक्काबुक्की, घोषणा, तसेच एकमेकांविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. काही ठिकाणी हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीमुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

टाइम्स स्पेशल

राड्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. अतिरिक्त पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.काही काळासाठी संबंधित परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गांवरील वाहतूकही वळवण्यात आली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच असा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या राड्याप्रकरणी नेमकी सुरुवात कशी झाली, कुणी चिथावणी दिली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg