loader
Breaking News
Breaking News
Foto

नासा तसेच इस्रो अंतराळ संशोधन संस्थांना भेट देण्यासाठी मंडणगड तालुक्यातील ५ विद्यार्थ्यांना संधी

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील बाणकोट, गोठे, कोन्हवली, चिंचघर आणि वाल्मिकीनगर या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शिकणाऱ्या एकूण ५ विद्यार्थ्यांची नासा आणि इस्त्रो येथील अंतराळ संशोधन संस्थांना भेट देण्यासाठी निवड झाल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी आदिंसह अखंड मंडणगड ताुक्यातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांमधून शास्त्रज्ञ घडावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाच्या गुणवत्ता कक्षाने नासा, इस्रो सफर हा उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट देण्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या कार्य क्रमांतर्गंत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एकुण ५ विद्यार्थ्यांना त्यांच्या एकूणच चौकस बुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकाटी आणि जिज्ञासा यांच्यातील अंगी बाणलेल्या त्यांच्यातील एकनिष्ठतेमुळे या वर्षी संधी उपलब्ध झाली आहे.

टाईम्स स्पेशल

यामध्ये तालुक्यातील इस्त्रो भेटीसाठी कोन्हवली येथील शार्दुल राकेश पणदीरकर (इयत्ता ६ वी), वाल्मिकीनगर येथील रुंजी विश्वनाथ जाधव (इयत्ता पाचवी), चिंचघर येथील श्रेया दयाळ चिंचघरकर (इयत्ता सहावी) तर गोठे नंबर १ ची विद्यार्थिनी अपेक्षा सुनील बोत्रे,( इयत्ता ७ वी)आणि मानस प्रशांत जाधव (इयत्ता ७ वी) बाणकोट प्राथमिक मराठी शाळा या दोन विद्यार्थ्यांची नासा आणि इस्त्रो भेटीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे मंडणगडसारख्या एका दुर्गम तालुक्यातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानातील प्रगत तंत्रज्ञान जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत देखील आजही दर्जेदारच शिक्षण मिळते हे या विद्यार्थ्यांच्या निवडीने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg