loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बबनराव नागरगोजे यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर

पनवेल (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार साठी निवड झालेल्या व्यक्ती व संस्थांची नावे जाहीर करण्यात आली असून, रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील डॉ. बबनराव नागरगोजे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन लेखक गटातून त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. डॉ. नागरगोजे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी सातत्याने कार्य केले असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता व्यसनमुक्ती जनजागृती दिंडीची सुरुवात गेटवे ऑफ इंडिया येथून होऊन सांगता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. त्यानंतर दुपारी व्यसनमुक्ती विषयक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

डॉ. बबनराव नागरगोजे हे भाजप वैद्यकीय सेल कोकण विभागाचे संयोजक असून रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांना यापूर्वी रायगड भूषण, आरोग्यम धनसंपदा तसेच इतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. बबनराव नागरगोजे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्याचा मान उंचावला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg