loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूलच्या दोन माजी विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे, तालुका. खेड, जिल्हा. रत्नागिरी या प्रशालेचे शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील इ. बारावीचे माजी विद्यार्थी कॅडेट. विराज सुनील कारभळ याची अग्निवीर नेवी या विभागांमध्ये व कॅडेट आकाश बबन ढेबे यांची अग्निवीर आर्मी या विभागांमध्ये निवड झाली आहे. हे यश मिळवून त्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच आजतागायत शाळेतील अनेक माजी विद्यार्थी सैन्य दलात उच्चपदस्थ अधिकारी बनून सक्षमपणे नेतृत्व करत देशाची सेवा करत आहेत. लष्करी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा दीपस्तंभ म्हणून उभी असलेली ही रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव सैनिकी शाळा विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलातील करिअरची संधी निर्माण करून देणारी जणू राजमार्गच ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ रामदासभाई कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, संस्था खजिनदार सुभेदार काशिराम सकपाळ यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व संस्था सदस्य, कमांडंट श्रीक्रिशन प्राचार्य डॉ खोत एम एस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कॅडेट विराज सुनिल कारभळ व कॅडेट आकाश बबन ढेबे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg