दापोली :- जागतिक जलदिन निमित्ताने जलदेवतेला नतमस्तक होण्यासाठी आणि शुद्ध पाण्याचे महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन दापोली तालुक्यातील जालगाव येथे निवेदिता प्रतिष्ठानचे कार्यालय आणि भारतरत्न पा.वा.काणे स्मारक या ठिकाणी करण्यात आलं होतं, अशी माहिती अध्यक्ष डॉ. परांजपे यांनी दिली. श्रीक्षेत्र केशवराज येथून आणलेल्या जल कलशाचे पूजन ज्येष्ठ सदस्य रमेश जोशी आणि त्यांच्या पत्नी सौ. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
जलपूजनाच्या निमित्ताने पाण्याची सद्यस्थिती आणि कचर्याची परिस्थिती काय आहे याचे व्हिडिओ आणि भित्तीफलकांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकांच्या आणि वस्तूंच्या माध्यमातून एक आगळे वेगळे प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. ज्या प्रदर्शनातून जल प्रदूषण आणि प्लास्टिक यामुळे मानवी शरीरात कशा पद्धतीने प्लास्टिकचा शिरकाव केलाय, किंबहुना एका वर्षाला आपण २५० ग्रॅम इतक्या मायक्रो आणि नॅनो प्लास्टिकचे सेवन करत असतो याची जाणीव करून देण्यात आली होती. त्याच प्रमाणे प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचा कसा उपयोग करता येईल आणि प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी कशा पद्धतीने प्लास्टिकचा कचरा गोळा करणे आवश्यक आहे, आदी बाबतची सर्व माहिती प्रदर्शनातून मांडण्यात आली होती. त्याचप्रमाणे कोकणच्या परंपरेचे आठवण करून देणारे पन्नास ते दीडशे वर्षांपूर्वीच्या वस्तूंचे दालनही सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आलं होतं. शेकडो नागरिकांनी या जलपूजनाचा आणि प्रदर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, जालगाव ग्रामपंचायत सदस्य शोभा दांडेकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे, जालगाव आणि दापोली तालुका व्यापारी संघटनेचे संस्थापक सचिव मिलिंद शेठ, जालगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समीर शेठ, खजिनदार अण्णा साबळे, जाल गावचे पोलीस पाटील धीरज कदम, भारतीय जैन संघटनेचे मुकेश जैन, चेतन जैन, पदाधिकारी आणि सदस्य तसेच जालगाव आणि दापोली येथील विविध क्षेत्रातील नागरिक या विशेष जलपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.

























.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.