loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदतर्फे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष व सदस्यांचा यथोचित सन्मान

खेड (दिलीप देवळेकर) - खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.माधवीताई बुटाला यांच्या दालनामध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष व तसेच सदस्य यांचा यथोचित सन्मान नगरपालिकेच्यावतीने करण्यात आला. त्यामध्ये कोकण प्रांतामध्ये सर्वाधिक सामाजिक सेवेचे उपक्रम राबवत एक नंबर स्थानावर येत विविध असे पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल नगराध्यक्षांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, क्लबचे सचिव ओम जाधव तसेच लायन्स क्लबच्या सर्व सभासदांचा यथोचित सन्मान नगराध्यक्ष सौ.माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतिश चिकणे, गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, सभापती सुनील दरेकर, नगरसेवक प्रेमळ चिखले, नगरसेवक मीनार चिखले, नगरसेविका सौ. रसिका खेडेकर आदींच्या उपस्थितीत या सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या व आपली ओळख कोकणामध्ये सर्वाधिक काम करून वेगळ्या पद्धतीने खेडवासींयांच्या मनावर रुजवणार्‍या या संस्थेचा सन्मान केला गेला. कार्यक्रमाला लायन्स क्लबचे खजिनदार माणिक लोहार, उपाध्यक्ष अविनाश दळवी, शैलेश धारिया, प्रवीण पवार, डॉक्टर मरकड , डॉक्टर वेद तलाठी, नईम चौगुले, सागर करवा आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg