loader
Breaking News
Breaking News
Foto

शिलार धरण प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा आमरण उपोषणाचा इशारा

कर्जत (जयेश जाधव) - कर्जत तालुक्यातील कोठिंबे खान्दन गावाजवळील आदिवासी वस्तीमध्ये शिलार धरण प्रकल्पाच्या संदर्भात रविवारी एक महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे शिलार धरण प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवित आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. या सभेला पक्षाचे कर्जत शहराध्यक्ष ऍड. भाऊसाहेब मोरे उपस्थित राहून त्यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात शिलार धरण प्रकल्पामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम, विशेषतः आदिवासी समाजावर होणारा अन्याय, विस्थापनाची भीती आणि बेघर होण्याची शक्यता यावर सखोल भाष्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऍड. मोरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा प्रकल्प आदिवासी समाजासाठी अत्यंत घातक असून त्याचे दूरगामी परिणाम त्यांना सहन करावे लागतील. त्यामुळे आदिवासींच्या हिताचा विचार करून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष या प्रकल्पाला ठाम विरोध करत आहे. तसेच, गरज पडल्यास पक्षातर्फे आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेतले जाईल, असे सांगण्यात आले.

टाइम्स स्पेशल

पुढे बोलताना त्यांनी असेही नमूद केले की, सामान्य नागरिक, गरीब शेतकरी आणि आदिवासी समाजावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी सरकारने वेळीच लक्ष दिले पाहिजे. या सभेला दिनेश माधव रसाळ, ऍड, प्रदीप भोईर, ऍड. भाऊसाहेब पंजू मोरे, काशिनाथ रसाळ, ऍड. सुदाम धूळे, रवींद्र गोमारे, गणेश रसाळ, छगन सावंत, मंगेश सावंत, कुशल कवठे, संतोष कदम यांसह खांदन, शिलार वाडी, धोत्रे आदी गावांमधील सुमारे २०० ते २५० ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg