loader
Breaking News
Breaking News
Foto

रेल्वे अपघातात पाय हिरावले, पण जिद्दीने मातृत्व जिंकले

नवी मुंबई : अत्यंत दुर्मीळ आणि गुंतागुतीच्या अशी गर्भधारणा असलेल्या तसेच रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या एका डॉक्टर महिलेने मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये 3.2 किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला. प्रगत वैद्यकीय उपचार आणि तज्ज्ञांच्या टीमवर्कमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. धाडस आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवेच्या एक प्रेणादायी उदाहरण ठरले आहे. प्रसूती तज्ञ डॉ. स्वप्ना दहे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनुरंजिता पल्लवी आणि डॉ. संतोष जयभाये यांच्या टीमने, गुंतागुंतीची गर्भधारणा यशस्वीरित्या हाताळली. रुग्ण डॉ. रोशन शेख, यांनी यापूर्वी एका भीषण रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावले होते. यानंतर शारीरिक आणि भावनिक आव्हानांवर मात करत त्यांनी मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे ३.२ किलो वजनाच्या एका निरोगी बाळाल जन्म दिला. डॉ. रोशन शेख यांचा मातृत्वाचा प्रवास संघर्षमय असूनही प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. रेल्वे अपघातानंतर त्यांनी त्यांचे पुन्हा आयुष्य नव्याने उभे केले, कृत्रिम पायांच्या साहाय्याने चालु लागल्या आणि दैनंदिन आयुष्यातील कित्येक आव्हानांना धाडसाने सामोरे गेल्या. इतकंच नाही तर त्यांनी एमबीबीएस आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत बांद्रा येथील गुरु नानक हॉस्पिटलमध्येही सेवा देण्यास सुरुवात केली. स्वतःच्या संघर्षाला त्यांनी इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण तयार केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. रोशन शेख म्हणाल्या, मी गर्भवती असल्याचं कळणं हा माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण होता. अनेक संकटांनंतर मला हा दैवी आशीर्वाद वाटला आणि यामुळे माझ्या आयुष्याला नवे वळण मिळाले. मात्र त्याचवेळी आनंदसोबतच भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. त्यामुळे मी माझी मैत्रीण डॉ. स्वप्ना दहे हिच्याशी संपर्क साधला आणि तिथून पुढे माझा गर्भधारणेचा प्रवास मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. या आनंदासोबतच डॉ. रोशन यांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागला. कृत्रिम पायांमुळे दीर्घकाळापर्यंत चालणे, जिने चढणे, शारीरीक संतुलन राखणे आणि घरकाम करणे हे सर्वच अवघड होतं. त्यातच गर्भावस्थेदरम्यान त्यांना गर्भावस्थेतील मधुमेहाचे (Gestational Diabetes) निदान झाले होता. तरीही कुटुंबाचा पाठिंबा, सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमित वैद्यकीय तपासणीमुळे त्यांनी प्रत्येक अडथळ्यावर मात केली. खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनुरंजिता पल्लवी म्हणाल्या, हे अत्यंत गुंतागुंतीचे प्रकरण होते. रुग्णाने दोन्ही पाय गमावल्याने कृत्रिम पायांच्या आधाराने शारीरक हालचाल करणे आणि गर्भधारणेचं व्यवस्थापन करणे अधिक आव्हानात्मक होतं. त्यातच गर्भावस्थेतील मधुमेहामुळे आई आणि बाळासाठी धोका वाढू शकत होता. त्यामुळे त्यांना काटेकोरपणे आहार घेणे आणि नियमित तपासणी करण्याची आवश्यकता होती.

टाइम्स स्पेशल

प्रसूती तज्ञ डॉ. स्वप्ना दहे म्हणाल्या, संपूर्ण गर्भावस्थेत रुग्णाने अत्यंत सकारात्मकता आणि धैर्य दाखवले. नियमित तपासणी, योग्य औषधोपचार आणि वैद्यकिय सल्ल्याचं काटेकोर पालन करण्यात आलं. अ‍ॅनेस्थेशिया तज्ज्ञ, नवजात शिशु तज्ज्ञ, न्यूरोसर्जन यांची टीम सज्ज होती. आई आणि बाळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजित सिझेरियन करण्यात आलं आणि निरोगी बाळाचा जन्म झाला. हा क्षण आमच्यासाठीही अत्यंत भावनिक होता. प्रसूतीनंतर 2-3 दिवसांतच रुग्णाला हालचाल सुरू करणं शक्य झालं, ज्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी होतो आणि रुग्ण जलद बरा होतो. त्या पुढे म्हणाल्या, आई आणि बाळ दोघांनाही चार दिवसांनंतर घरी सोडण्यात आले. विशेष म्हणजे सिझेरियननंतरही फिजिओथेरपीच्या मदतीने त्या कृत्रिम पायांच्या साहाय्याने चालू शकल्या. याचून त्यांची जिद्द आणि दांडगा आत्मविश्वास दिसून येतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg