loader
Breaking News
Breaking News
Foto

नियंत्रण सुटलेली कार घरासह दुकानात शिरली; कळंबनी उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात

खेड (दिलीप देवळेकर) - मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबनी येथे आज एका भरधाव फॉर्च्यूनर कारने हॉटेल आणि घराला जोरदार धडक दिल्याने मोठी खळबळ उडाली. कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अगदी समोरच ही घटना घडली असून, या भीषण अपघातात कारसह दुकानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, सदर फॉर्च्यूनर कार मुंबईच्या दिशेने जात होती. कळंबनी परिसरात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेल व घरात शिरली. धडक इतकी भीषण होती की हॉटेलच्या दर्शनी भागाचे आणि आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.

टाइम्स स्पेशल

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ’दैव बलवत्तर’ म्हणून या अपघातात कोणालाही गंभीर इजा किंवा दुखापत झालेली नाही, मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गावर अशा प्रकारे कार थेट घरात शिरल्याने वाहनचालकांच्या वेगावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खेड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg