loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड रेल्वेस्थानका दरम्यान प्रवाशाचा रेल्वेतच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

खेड (वार्ताहर) - येथील रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशाचा रेल्वेतच हृद‌यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:४० वाजताच्या दरम्यान घडली. अनिकेत शिवचरण हरणे (वय-३३ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. बोरगांव बौद्धकॉलनी, ता. भातकुली, जि.अमरावती) असे या मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मयत अनिकेत हरणे, या दुर्देवी घटनेची खबर देणार चंदा शिवचरण हरणे व मित्र सुरज दिलीप खरेले (रा. चांदूर, जि. अमरावती) असे हे तिघे रेल्वे नं. ०११३९, नागपूर मडगांव स्पेशल एक्स्प्रेसमधून बडनेरा रेल्वे जंक्शन ते रत्नागिरी असा प्रवास करीत असता रेल्वे गाडी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:४० वाजताच्या सुमारास खेड रेल्वे स्टेशन येथे थांबली तेव्हा मयत अनिकेत हरणे यांच्या छातीत दुखू लागले म्हणून त्यास रिक्षाने एका खासगी दवाखान्यात दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास उपचाराकरीता दाखल केले असता उपचारादरम्यान दुपारी १२:५७ वाजता डॉक्टरांनी मयत घोषित करून हृद‌यविकाराच्या धक्क्याने मयत झाल्याचे सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg