loader
Breaking News
Breaking News
Foto

साहित्यिक विलास गुरुजी यादव यांचा अमृत महोत्सव म्हसळ्यात दिमाखात साजरा

म्हसळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुप्रसिद्ध निवृत्त शिक्षक, कवी आणि लेखक विलास (गुरुजी) यादव यांचा ७५ वा अमृत महोत्सव सोहळा म्हसळा येथील श्री सिद्धी हॉटेलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुजींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यादव कुटुंबाच्यावतीने गुरुजींचे औक्षण करून आणि ७५ दिवे लावून या मंगलमय सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तहसीलदार सचिन खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस महादेव पाटील, वैद्यकिय अधिकारी महेश मेहता, शशिकांत शिर्के, संजय खांबेटे, प्रसाद बोर्ले, नगरसेविका राखी करंबे, निवृत्त शिक्षक दिलीप करंबे, प्रदिप कदम, महेश पवार, उदय कळस, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक, उद्योजक योगेश करडे, उद्योजक रमेश जैन, रेखा धारिया, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, यांच्यासह शिक्षक, आणि डॉक्टरांनी उपस्थित राहून गुरुजींचा सत्कार केला. गुरुजींचे ज्येष्ठ सुपुत्र सुशिल यादव यांनी या संपूर्ण दिमाखदार सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते. यावेळी उमरोठकर गुरुजी, मोहिते गुरुजी आणि इतर स्नेहीजनांनी गुरुजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg