loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली विधानसभेमध्ये भाजपा स्वतंत्र लढणार - तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे

खेड (प्रतिनिधी) - दापोली विधानसभा मतदारसंघात मित्र पक्षांची वाढती आवक आणि बदललेले राजकीय गणित लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आला असून दापोलीसोबतच गुहागर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या खेड तालुक्यातील भागामध्येही योग्य वेळी पक्षाची स्वतंत्र भूमिका जाहीर केली जाईल. याच अनुषंगाने आज गुणदे पंचायत समिती गणातून संजय आखाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

टाईम्स स्पेशल

अर्ज दाखल करताना नगरसेविका वैभवी खेडेकर, रहीम सहिबोले, निलेश बामणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान घोषणाबाजी, उत्साह आणि विजयाचा निर्धार दिसून आला. आगामी निवडणुकांमध्ये भाजप स्वतंत्रपणे उतरत असल्याने दापोली विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होणार हे मात्र निश्चित.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg