loader
Breaking News
Breaking News
Foto

गोगटे कॉलेजच्या 74 च्या बॅचचे अनोखे दशकपूर्ती स्नेहसंमेलन

रत्नागिरी - रत्नागिरी येथील र.प. गोगटे महाविद्यालयाच्या 1974 च्या बीए बॅचचे दहावे दशकपुर्ती स्नेहसंमेलन नुकतेच रत्नागिरी येथे पार पडले. सुमारे 70 ते 80 वयोगटातील 30 ज्येष्ठांनी कॉलेज जीवनानंतरच्या वाटचालीतील परस्परांच्या सुखदुःखाची आठवणी शेअर केल्या. विशेष म्हणजे ऋणानुबंध परिवारातील पाच कर्तृत्ववान मातांचा ह्रद्य सन्मान करण्यात आला. 1974 च्या बॅचचे हे सलग दहावे स्नेहसंमेलन असल्याने सर्वांमध्ये मोठा उत्साह होता. पहिले संमेलन श्री गणपतीपुळे क्षेत्र येथे झाले होते. त्यामुळे दहाव्या संमेलनाची सुरुवात श्री गणपतीपुळे येथे श्री गणेश दर्शनाने करण्यात आली. प्रारंभी सदस्यांच्या नातेवाईकांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कणकवलीचे विद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वललाने सुरुवात केल्यानंतर राजन खानविलकर यांनी खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऋणानुबंध परिवारातील डॉ. विजया जोशी, शमीम मुकादम, शैला खानोलकर, निर्मला आचरेकर, माया शिंदे या कर्तृत्ववान मातांचा भावपूर्ण वातावरणात शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मानाने सर्वजण भारावून गेले. अनेकांना आपल्या आठवणी विशद करताना भावना आवरता आल्या नाहीत. त्यानंतर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्याना गौरविण्यात आले. यावेळी नव्याने परिवारात सामील झालेल्या नंदकुमार तांबे आणि पेंढारकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गजानन नाईक यांनी प्रास्ताविक आढावा यामध्ये ऋणानुबंध परिवाराचे मैत्रीचे महत्त्व स्पष्ट करून गेल्या दहा वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. माया देसाई शिंदे, सविता विलणकर, डॉ. विजया जोशी, रमेश भाई सुर्वे, निसार नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

करमणुकीचे कार्यक्रम आणि खेळ यामध्ये भालचंद्र करंदीकर यांचा तळीराम हा एकपात्री प्रयोग कमालीचा रंगला. तसेच ज्येष्ठ कवी शरचंद्र नातू यांनी बहारदार कविता अभिनयासह सादर करून वाहवा मिळविली. राजन खानविलकर, शैला खानोलकर, नीला जोशी चितळे, नीला दामले, सुचिता बंदरकर, रजनी आचरेकर यांनी एका पेक्षा एक सरस गीते गाऊन कार्यक्रमात रंगत भरली. रात्री शेकोटीचा कार्यक्रम म्हणजे संगीताची मैफल ठरली, मुस्ताकभाई पेटकर, दिलावर मुकादम, नीता आरेकर, विद्या ताडपत्रीकर, बाबा पिलणकर, विश्वनाथ शिर्के, आकाश शिंदे, पद्मजा शितोळे आदींनी उत्साहाने सहभाग घेऊन दहावे स्नेहसंमेलन यादगार ठरवले. या संमेलनात कॉलेज जीवनातील आणि कॉलेजमधील प्राध्यापकांच्या आवर्जून आठवणी काढून त्यांचे ऋण व्यक्त केले. समारोप सत्रात राजेंद्र सावंत यांनी आपला परिवार आणि मैत्री कायम ठेवण्याचे आवाहन केले. राजन खानविलकर आणि गजानन नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg