loader
Breaking News
Breaking News
Foto

काशीद समुद्रात पुण्याचा पर्यटक बुडाला, चोवीस तासांनंतर सापडला मृतदेह

कोर्लई (राजीव नेवासेकर) - पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी पुण्याचा पर्यटक सोमनाथ भोसले बुडून बेपत्ता झाला होता. मुरुड पोलिस व स्थानिकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी चोवीस तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला आहे. सोमनाथ राजेश भोसले वय 24 राहणार काळेपडळ, हडपसर, पुणे (मुळ राहणार शिर्डी, ता. शिर्डी, जि. अहिल्यानगर ) येथून रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी काशीद बीच येथे दि.18 रोजी दुपारी 3.00 वा. सुमारास त्याच्या मित्र मैत्रिणीसोबत एकूण 26 श्रीनिधी कंपनी हडपसर पुणे असे फिरायला आले होते. त्यातील वरील इसम हा हरवलेला होता. सदर इसम मिळून न आल्याने मुरुड पोलीस ठाणे मनुष्य मी. नं. 01/2026 दाखल करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुरुड पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गदमले, पोलिस हवालदार दसाडे, पोलिस शिपाई बारवे, लाईफ गार्ड व सागर रक्षक दल यांच्या मदतीने शोध घेतला असता आज दि.19 जानेवारी रोजी 16.00 वा. सोमनाथ भोसले याचा मृतदेह काशीद बीच येथे सापडला असून पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg