loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी सुवर्णकार-सराफ संघटनेच्या ‘सुवर्ण लक्ष्मी योजना 2025’ सोडत समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद.

रत्नागिरी - रत्नागिरी सुवर्णकार सराफ संघटना आयोजित ‘सुवर्ण लक्ष्मी योजना 2025’ चा भव्य सोडत समारंभ दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी मराठा भवन, रत्नागिरी येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास अंतिम फेरीत निवडून आलेल्या सर्व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या योजनेअंतर्गत मेगा ड्रॉमध्ये एकूण 26 आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच इतर उपस्थित भाग्यवान ग्राहकांना चांदीची नाणी देऊन सन्मानित करण्यात आले. मेगा बक्षिसांचे मानकरी पुढीलप्रमाणे – महादेव ज्वेलर्समार्फत सौ. आराध्या ओंकार शिवलकर यांना हुंडाई एक्सटर कार, संतोष विश्वनाथ खेडेकर ज्वेलर्समार्फत श्री. देवेंद्र साळवी यांना टीव्हीएस ज्युपिटर, जे. लालचंद सराफमार्फत गराटे अभिज्ञा अभिजीत यांना डबल डोअर फ्रीज, अमेय ज्वेलर्समार्फत वेदिका राऊत यांना 43 इंच टीव्ही, शा. जसराज ज्वेलर्समार्फत स्वप्नाली संजय आयरे यांना वॉशिंग मशीन प्रदान करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इतर बक्षिसांमध्ये (ओटीजी ओवन व टॉवर फॅन) विजेते पुढीलप्रमाणे होते – श्री. अजय साळुंखे (विन ज्वेलर्स), सोफिया शेख (खेडेकर गोल्ड स्मिथ), झाकीरा रिजवान काझी (भावना ज्वेलर्स), श्री. विलास झोरे, ( महेश सुभाष खेडेकर खेडेकर ज्वेलर्स), साहिल संदीप वाडेकर (प्रभाकर मोरेश्वर वैद्य ज्वेलर्स), प्रणिता प्रकाश नाचरे (हंसराज ज्वेलर्स), जहिरा युसुफ (अमेय ज्वेलर्स), सोनाली महेंद्र घाडगे (लालचंद गोल्ड), श्रेया उजगावकर (महावीर गोल्ड), नजमुनिसा बुडिये (रत्नशिल्प ज्वेलर्स), सायली देसाई (प्रमोद ज्वेलर्स), भूमिका सुरेंद्र चंदरकर (शा. जसराज ज्वेलर्स) रेशमा गिजविले (खेडेकर गोल्ड सिल्वर), वैष्णवी मुळे (व्ही. जी.कारेकर ज्वेलर्स), श्रद्धा पांचाळ(कमल ज्वेलर्स) प्रतीक राजेंद्र कांबळे (ओम प्रमोद ज्वेलर्स) अर्णव गुप्ता ( श्री नाकोडा गोल्ड ) आचल नितीन घोडके ( स्वानंद ज्वेलर्स )

टाइम्स स्पेशल

या भव्य सोडत समारंभाला रत्नागिरी नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे व उपनगराध्यक्ष समीरजी तीवरेकर यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध नियोजनात पार पडल्याने उपस्थित ग्राहकांनी रत्नागिरी सुवर्णकार सराफ संघटनेचे मनःपूर्वक कौतुक केले. विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ग्राहकांचा उत्साह आणि समाधानाचे वातावरण यामुळे हा सोडत समारंभ संस्मरणीय ठरला. असाच कार्यक्रम दरवर्षी मोठय़ा धुमधडाक्यात आयोजित केला जाईल, असे आयोजकांनी जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg