loader
Breaking News
Breaking News
Foto

मांदिवली येथील बॉक्साईट वाहतुकीची होणार चौकशी

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील मांदिवली गावातील उर्दू शाळेजवळून सुरू असलेल्या बॉक्साईट वाहतुकीमुळे तेथे शिकत असलेल्या शाळकरी मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेवून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना नोटीस पाठवल्यावर आता जिल्हा प्रशासन जागे झाले असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक समिती गठीत केली असून ही समिती आता २३ जानेवारी रोजी मांदिवली येथे जावून चौकशी करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या संदर्भात चौकशी करण्यासाठी दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, दापोलीचे तालुका आरोग्य अधिकारी हे या समितीचे सदस्य असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण येथील उपप्रादेशिक अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. हि समिती शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मांदिवली येथे जावून स्थळपाहणी व चौकशी करणार असून आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg