loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा रक्तरंजित; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

संगलट खेड (इक्बाल जमादार) - मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव तालुक्यातील गारळ गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला असून, दोन कार आणि एका दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माहितीनुसार, गारळ फाट्याजवळील नवीन हॉटेल आनंद भुवन समोर सुझुकी बलेनो (MH 46 DA 1229) आणि व्हॅगनआर (MH 08 BE 7561) या दोन कारने होंडा शाईन दुचाकी (MH 06 BR 6826) ला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत अण्णा काळे (रा. खांदाड, ता. माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अण्णा काळे महामार्ग ओलांडत असताना समोरून व बाजूने आलेल्या कारने त्यांना दोन वेळा धडक दिल्याचे स्पष्ट दिसते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धडकेनंतर ते काही अंतर फरफटत गेले असून अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

या दुर्घटनेमुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी तसेच महामार्ग ओलांडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिक व प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg