loader
Breaking News
Breaking News
Foto

कासरगोडमध्ये भाजप-एनडीएचे शक्तीप्रदर्शन; अश्विनी एम.एल. यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल (प्रतिनिधी) - केरळ विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कासरगोड मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आघाडीने मोठे शक्तीप्रदर्शन करत अधिकृत उमेदवार अश्विनी एम.एल. यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साही वातावरणात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड जनसमुदायात दाखल केला. याप्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रभारी म्हणून प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ढोल-ताशांचा गजर, भारत माता की जयच्या घोषणा आणि हातात भाजपचे झेंडे घेतलेले हजारो समर्थक यावेळी रस्त्यावर उतरले होते. या रॅलीने संपूर्ण कासरगोड शहर भगवेमय झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मतदारांचा वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील हा अभूतपूर्व जोश पाहता, या मतदारसंघात यावेळी निश्चितपणे परिवर्तन होऊन भाजप महायुतीचा विजय होईल, असा ठाम विश्वास आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. या सोहळ्यासाठी कर्नाटकचे आमदार हरेश पुंजा, आमदार गुरुराज गंटीहोळी, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री हर्षिका पूजनाचा, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक संतोष शेट्टी, शिवाजी भगत, अक्षय सिंह, जयचंद्रन वासु, शिवाजी शेट्टी, सुभाष शेट्टी, अभिलाष शेट्टी, सुजीत पुजारी यांच्यासह एनडीएचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg