loader
Breaking News
Breaking News
Foto

पहिल्या कोकण विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अ‍ॅड. तु.ल. डफळे यांची निवड

खेड - समतावादी, संविधानवादी सांस्कृतिक मूल्यसंस्कृतीवर उभ्या असलेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेतील १ ले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन दिनांक दिनांक २९ मार्च २०२६ रोजी खेड, जि. रत्नागिरी येथे संपन्न होत आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रसिद्ध शिक्षण व कायदे तज्ञ अ‍ॅड. तु.ल डफळे यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात कष्टकरी शोषित शेतकरी व बहुजनांच्या बाजूने अभिव्यक्तीच्या वाटा मोकळ्या करणारी विद्रोही साहित्य संमेलने १९९९ पासून सातत्याने आयोजित केली जात आहेत. मराठी भाषिक सांस्कृतिक अवकाशात समता व लोकशाहीची ऐतिहासिक लढाई या निमित्ताने कार्यरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी, पुणे, मनमाड, कणकवली, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर, वर्धा, अमळनेर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, निपाणी व पुणे येथे एकंदर 22 अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. कालकथित बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम कनिराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब डॉ. आ. ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. अशोक राणा, लोकनाथ यशवंत यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत. यात कोकणातील चार साहित्यिकांचा समावेश आहे. याच परंपरेतील १ ले कोकण विभागीय विद्रोही साहित्य संमेलन खेड येथे आयोजित करण्यात येत आहे. स्वागताध्यक्ष पदी निवड झालेले अ‍ॅड. तु.ल. डफळे हे २००२ सालापासून कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबईचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. ते टीबीके कॉलेज ऑफ सायन्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, भरणेचे चेअरमन आहेत, तसेच त्यांनी कोकणरत्न कला कॉलेज भरणेच्या स्थापनेस महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे.

टाईम्स स्पेशल

शिक्षण हे समाज घडवण्याचे प्रभावी साधन असल्याचे मनाशी बाळगून त्यांनी खेड तालुका व ग्रामीण परिसराच्या शैक्षणिक व समाज कल्याणाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कुणबी समाजोन्नती संघाचे १९७२ पासून सक्रिय सदस्य असलेल्या अ‍ॅड. तु. ल. डफळे यांनी कुळ कायद्यांतर्गत हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. अशा कायदे व शिक्षण तज्ञ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या अ‍ॅड. तु.ल. डफळे यांची स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. याच बैठकीत संयोजन समितीचे अध्यक्ष संजय कासारे, मुख्य संयोजक अनिल येसोंडे, कार्याध्यक्ष रवी उदय जाधव, निमंत्रक संजय काशीद, कोषाध्यक्ष सचिन मोहिते, मुख्य कार्यवाहक, शाहीर विठोबा साळवी, संघटक मोहन चव्हाण उपाध्यक्ष बाबा राम पवार, शशिकांत शिंदे, मेहबूब मोहीमतुले, अरुण मोरे यांची निवड करण्यात आली आहे. स्वागत समिती व संयोजन समितीच्या या विशेष बैठकीसाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले (पुणे) राज्य उपाध्यक्ष अॅड. सुदीप कांबळे (सिंधुदुर्ग) व भाई अशोक मोरे (रायगड) डॉ विलास बुवा हे पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती कोकण विद्रोही मराठी संमेलनाचे मुख्य संयोजक - अनिल येसोंडे ( अध्यक्ष, कोकण बुध्द धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन, खेड) यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg