loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजनवेल कॉलेज मध्ये इलेक्ट्रिकल टेक्निशियन बॅचचा शुभेच्छा समारंभ

वरवेली (वार्ताहर) - डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मार्गताम्हाने ता.चिपळूण संचालित दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय आणि भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल येथे इलेक्ट्रिकल टेक्निशियन या व्यावसायिक कोर्स च्या पाहिल्या बॅच चा शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जन शिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील अंजनवेल कॉलेजमध्ये विविध व्यावसायिक कोर्स चे आयोजन करण्यात येते. या अगोदर संगणक सहाय्यक कोर्स चे यशस्वी बॅचनंतर इलेक्ट्रिकल टेक्निशियन या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन सत्रात चाळीस विद्यार्थ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले. मुलांबरोबर मुलींनीही हा कोर्स पूर्ण केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारे अंजनवेल कॉलेज हे पहिले कॉलेज असेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे मत अंजनवेल कॉलेजचे प्राचार्य मंगेश गोरीवले यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना लाईट फीटिंग, वायरिंग, पंखा दुरुस्ती, आर्थिंग, विद्युत जोडणी, स्विच बोर्ड या सर्व प्रकारचे प्रात्यक्षिक देण्यात आले. तीन महिने चालणाऱ्या कोर्स मध्ये चाळीस विद्यार्थ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

शुभेच्छा समारंभासाठी जन शिक्षण संस्थान रत्नागिरी मार्गदर्शिका अमृता शेटे, इलेक्ट्रिकल टेक्निशियन ट्रेनर महेश सकपाळ, परीक्षक आयुध पालशेतकर, प्राचार्य मंगेश गोरीवले, उदय दामले, शिवाजी सरगर, शावरी बंडीछोडे, दिपाली कांबळे, प्रा.शलाका पाटील, प्रा.उज्वला भोबस्कर, प्रा.सोनाली अहिरराव, दशरथ नाटेकर, रवींद्र हळदे, सूर्यकांत डिके उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.उमेश जाधव यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg