loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.पू. प्रा.आदर्श शाळा सुसेरी नंबर 1 येथे सिद्धयोग लॉ कॉलेज मार्फत कायदेविषयक व्याख्यान संपन्न

खेड - खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या दायित्व या उपक्रमाखाली कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत आणि दायित्व उपक्रमाचे प्रमुख ऍड. दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळा सुसेरी नंबर 1 येथील विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी २० मार्च रोजी कायदेविषयक जागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक संचित भाग यांनी ऍड. दिलीप चव्हाण, सिद्धयोगच्या काही विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दिलीप चव्हाण उपस्थितताना सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या दायित्व उपक्रमाविषयी माहिती देताना म्हणाले की "आमचे कॉलेज हे नेहमी समाजात कायदे विषयी जनजागृती शिबिरं तसेच व्याख्यानं आयोजित करून जनजागृती करत असते. समाजातील विविध वयाच्या घटकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे हे लॉ कॉलेज म्हणून हे आमचे कर्तव्य आहे आणि या कर्तव्यपूर्तीमध्ये आमच्या प्राचार्या, सर्व शिक्षक आणि बहुतांश विद्यार्थी नेहमीच अग्रेसर असतात."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुसेरी शाळेत सिद्धयोगमधील भावी वकिलांनी पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी खालील विषयांवर संवाद केला आणि त्यांना मार्गदर्शन केले. बाललैंगिक कायदे विषयी स्नेहल शिरकर, तर सायबर लॉ विषयी निशा सरतापे आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा या विषयी कौतुभ जोशी या तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती देऊन शेवटी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. या कायदेविषयक व्याख्यान कार्यक्रमात विधी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनी अपूर्वा जाधव तसेच प्रथम वर्षाचे सेजल गोवले, स्वप्नाली पवार, रूपाली गुरव, वैष्णवी निजामपरकार, सिद्धी शिंदे, मैथिली कोपकर, तेजस राऊत, यश मुंडेकर, सुहास वांद्रे, रामचंद्र महाडिक आणि सिद्धयोगचे माजी विद्यार्थी संदीप गमरे यांनी देखील सहभाग घेतला. शाळेच्या शिक्षिका विजया जोशी यांनी सूत्रसंचालन तर शिक्षक संजय साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले सरते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg