loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कर्जीमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे

संगलट खेड (इक्बाल जमादार) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत क्षेत्रीय प्रकल्पाच्या अनुषंगाने खेड तालुक्यातील प्रख्यात असलेले आदर्श हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कर्जीच्या विद्यार्थ्यांसाठी योगासने आणि प्राणायाम प्रात्यक्षिके या विषयावर 15 दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सदृढ रहावे आणि त्यांच्यामध्ये शिस्त व एकाग्रता वाढीस लागावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरासाठी प्रशालेतील शिक्षिका स्मिता खानविलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिबिराच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व पटवून दिले. केवळ शारीरिक व्यायामच नव्हे तर मानसिक शांतीसाठी ही योग कसा आवश्यक आहे याचे मार्गदर्शन त्यांनी प्रात्यक्षिकांसह केले. या शिबिरात एकूण 25 विद्यार्थी सहभागी होऊन योगासनांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला स्कूल कमिटी अध्यक्ष अखलाक परकार, संस्था अध्यक्ष जैनुद्दीन इस्माईल परकार, सेक्रेटरी फैयाज उमर परकार,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. फरहीन भाक्षे, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. सदर उपक्रमाचे पालक वर्गाकडूनही कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg