लांजा (संजय साळवी) - लांजा नगरपंचायतीच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शहर प्रारूप विकास आराखड्याला तात्काळ स्थगिती मिळावी अशी मागणी लांजा - कुवे शहर बचाव समितीकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन सोमवारी २३ मार्च रोजी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांना सादर करण्यात आले. लांजा नगरपंचायतीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडा (डीपी प्लॅनला) अगदी सुरुवातीपासूनच लांजा आणि कुवे येथील नागरिकांनी कडाडून विरोध केला होता. नागरिकांना देशोधडीला लावणारा हा प्रारूप विकास आराखडा आम्हाला नकोच किंबहुना तो रद्दच करावा अशी आग्रही मागणी सुरुवातीपासूनच करण्यात आलेली आहे.
यापार्श्वभूमीवर लांजा - कुवे शहर बचाव समितीच्यावतीने सोमवारी मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लांजा शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल सुचीचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये अवलोकन केले असता नागरिकांनी प्रारूप विकास आराखड्यावर दाखल केलेल्या १५०० ते १६०० हरकतींपैकी केवळ ४० ते ५० हरकतींचेच फेरबदल करण्यात आलेले आहेत. उर्वरित हरकतींचे निर्णय अद्याप झालेले नाहीत किंवा हरकतदारांना आपल्याकडून हरकती संदर्भात निर्णय कळविण्यात देखील आलेले नाहीत. असे असतानाही संबंधित हरकतदारांच्या हरकतीबाबत कोणताही निर्णय घेतला तर त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच करण्यात आलेले फेरबदल हे प्रत्यक्ष जागेवर पाहणी न करताच केलेले असल्याने दिसून येत आहेत.
यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी लांजा - कुवे शहर बचाव समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. याची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे लांजा - कुवे शहर विकास आराखड्याबाबत नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या समवेत लांजा आणि कुवे नागरिकांची एक संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याला आमचा पूर्णपणे ठाम विरोध असून त्याला स्थगिती मिळावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन सादर करताना लांजा - कुवे शहर बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर, पदाधिकारी बाबा धावणे, शिवाप्पा उकली, सचिन लिंगायत, इकबाल गिरकर आदींसह अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.