loader
Breaking News
Breaking News
Foto

ठामपाचा कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर

ठाणे (अमोल पवार): ठाणे महानगर पालिकेचा कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला सन २०२६-२०२७ चा ६ हजार २२१ कोटी १२ लक्ष रूपयांचा मूळ अर्थसंकल्प सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाण्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. तसेच परिवहन सेवेचा ७९१ कोटी ८६ लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी ठामपा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे सादर केला. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊ शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, मुकेश मोकाशी, अभ‍िजीत पवार, सरफराज खान उर्फ सैफ पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ठाणे महानगर पालिकेवर सध्या १९८ कोटीचे कर्ज असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे महानगर पालिकेला केंद्राकडून जीएसटीची रक्कम स्टॅम्प सेज ३८५ कोटी शासनाकडून अनुदान येणे बाकी असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. ठाण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना ठामपात गेल्या चार वर्षात सुमारे चार हजार कोटीं शासकीय अनुदान प्राप्त झाले असले तरी ठाणे महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली करण्यात पालिका मागे पडली असल्याने पालिकेच्या तिजोरीत फारशी भर पडलेली नाही. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सन २०२६-२०२७ चा ५ हजार ६४५ कोटी रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणी पुरवठा आकार, व शहर विकास विभाग, अग्निशमन या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न रु. 3 हजार 523 कोटी 79 लक्ष ऐवजी रु.3 हजार 461 कोटी सुधारित करण्यात येत आहे. महापालिकेस प्राप्त होणा-या अनुदानाचा विचार करता, मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या रु. 612 कोटी 59 लक्ष अनुदाना ऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2025 अखेर रु. 1 हजार 269 कोटी 61 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी रु.1 हजार 493 कोटी 15 लक्ष अपेक्षित केले आहे व अमृत 2.00 योजनेसाठी रु. 60 कोटी 89 लक्ष कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते परंतु अमृत 2.00 अंतर्गत कर्ज न घेता केंद्र शासनामार्फत बिनव्याजी अर्थसहाय्यापोटी 98 कोटी 68 लक्ष प्राप्त झाले आहे.

टाईम्स स्पेशल

सन 2025-26 मध्ये महसुली खर्च रु. 3 हजार 722 कोटी 93 लक्ष प्रस्तावित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात रु.3 हजार 440 कोटी 80 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च रु.1 हजार 921 कोटी 41 लक्ष ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च रु.1 हजार 996 कोटी 39 लक्ष सुधारित करण्यात आला आहे. तसेच सन 2026-27 चा मूळ अर्थसंकल्पामध्ये महसूली उत्पन्न 4 हजार 078 कोटी अपेक्ष‍ित असून अनुदान व कर्जासह 6 हजार 221 कोटी 12 लक्ष रकमेची जमा बाजू 3 हजार 818 कोटी 17 लक्ष महसूली खर्च व 2401 कोटी 55 लक्ष भांडवली खर्चाचा रु. 1 कोटी 40 लक्ष अखेरच्या शिलकेसह रु. 6 हजार 221 कोटी 12 लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg