loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगडातील पेण वरेडी कोळीवाडा बंदरावर लागली भीषण आग, अनेक होड्या जळून खाक

पेण { धम्म्शील सावंत } तालुक्यातील वरेडी कोळीवाडा बंदरावर अचानक लागलेल्या आगीमुळे कोळी समाज बांधवांच्या अनेक होड्या, होड्यांचे इंजिन, मच्छी पकडण्याचे जाळ व डोळी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्यात . कोळी महिला आणि कोळी बांधवांच्या दोन तासांच्या अथक मेहनतीने आग आटोक्यात आलीय . मात्र झालेलं मोठं नुकसान कोळी बांधवांना जलद सावरता येण्या पलीकडचे आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरेडी म्हटले की पेण तालुक्यात आगरी कोळ्यांचा गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील अनेकांचा उदरनिर्वाह हा मच्छी व्यवसायावर आहे. आणि या व्यवसायासाठी होडी, जाळ आणि डोळी या महत्त्वाच्या बाबी आहेत.पण हेच सर्व जळून खाक झाल्याने कोली बांधवांवर मोठे संकट ओढावलेय. अनेकांवर उपासमारीची वेळ आलीये . शासनाने सदर नुकसानीची जलद पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे .

टाइम्स स्पेशल

यामध्ये दत्तात्रेय धर्मा कोळी, दामोदर दत्तात्रय कोळी, जनार्दन जोमा कोळी, परशुराम बाळाराम कोळी, चांगा गणपत कोळी,राकेश राम कोळी,विलास मारुती कोळी, जनार्दन धर्मा कोळी, राजेंद्र राम कोळी, नरेश राम कोळी, मंगेश दामोदर कोळी, वसंत विठ्ठल कोळी या कोळी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg