संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील तुरळ, धामापूर आणि करजुवे या गावांना जोडणार्या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर शेखर निकम यांनी तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणेला काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सदर मार्ग गेल्या वर्षभरापासून अत्यंत खराब अवस्थेत होता. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामस्थांनी देवरुख बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या खराब रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यूही झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अखेर सर्वपक्षीय ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी केली होती. आमदार निकम यांनी हा रस्ता लवकरच दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. सध्या रस्ता साफसफाई आणि खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून, पुढील टप्प्यात डांबरीकरणही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.






















































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.